जेद्दाह Liam Livingstone in RCB : 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघ आयपीएलमध्ये खेळत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे स्टार खेळाडू आहेत. आता लिलावात आरसीबी संघानं विजेतेपदासाठी मोठा डाव खेळला आहे. संघानं 8.75 कोटी रुपये भरुन 31 वर्षीय लियाम लिव्हिंगस्टोनला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. लिव्हिंगस्टोन T20 क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो कोणत्याही गोलंदाजीतही मदत करु शकतो.
We are L.I.V.I.N son! ❤️🔥
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 24, 2024
Our first Bid for Bold and we’ve got LIVINGSTUNNED to slay in red, blue, and gold! 🤩
A destroyer with the bat and a spin master with both leg and off spin up his sleeve, is #NowARoyalChallenger💪#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPLAuction #BidForBold #IPL2025 pic.twitter.com/puLPMjndBW
आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो : लियाम लिव्हिंगस्टोननं यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जकडून क्रिकेट खेळलं आहे. त्यानं आतापर्यंत 39 आयपीएल सामन्यांमध्ये 939 धावा केल्या आहेत, ज्यात 94 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 162 पेक्षा जास्त आहे. तो आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो, जी काही काळापूर्वी दिनेश कार्तिक करत होता. याशिवाय लिव्हिंगस्टोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो अर्धवेळ गोलंदाजीही करु शकतो. तसंच त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 11 विकेटही आहेत.
Liam Livingstone: Dangerous. Versatile. Matured. Ability to change gears up and down!
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 24, 2024
Head Coach Andy Flower has spoken. Listen up, 12th Man Army.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPLAuction #BidForBold #IPL2025 pic.twitter.com/6z0yY0oCdh
इंग्लंडसाठी जिंकला T20 विश्वचषक : लियाम लिव्हिंगस्टोन हा T20 विश्वचषक 2022 चं विजेतेपद जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्य होता. फायनलमध्येही त्यानं पाकिस्तानविरुद्ध एक ओव्हर टाकली होती. त्यानं इंग्लंडसाठी 55 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 881 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीतून 32 बळीही घेतले आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 844 धावा आहेत.
Liam Livingstone 🤝 #RCB 🤝 INR 8.75 Crore #TATAIPLAuction | #TATAIPL | @liaml4893 | @RCBTweets pic.twitter.com/hEfvBXfuyJ
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
आरसीबीनं तीन खेळाडूंना कायम ठेवलं होतं : आरसीबी संघात लियाम लिव्हिंगस्टोनच्या आगमनानं त्यांची फलंदाजी मजबूत होईल. यापूर्वी आयपीएल रिटेनशनमध्ये आरसीबी संघानं विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवलं होतं.
हेही वाचा :