एकाच कुटुंबातील १७ जण कोरोनाबाधित; अन् अशी केली त्यांनी कोरोनावर मात - कर्नाटक लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना लोकांसाठी एक भयानक स्वप्न बनलंय. देशभरात कोरोनाच्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्यानंतर लोक घाबरून गेले आहेत. एकदा त्यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला, की ते चिंताग्रस्त होतात आणि उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतात. मात्र, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये एका संयुक्त कुटुंबानं कोरोनाविरुद्धचा हा लढा जिंकून विजय मिळवलाय, जो बर्याच रुग्णांसाठी प्रेरणादायी आहे. 17 सदस्यांच्या या संयुक्त कुटुंबाला कोरोनाचा विळख बसला होता. मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व सदस्यांसानी कोरोनाला परतवून लावले. त्यांचा हा आत्मविश्वास तालुक्यातील इतर कोविड रूग्णांसाठी आदर्श ठरलाय. कोरोनाची लागण झालीये हे एकल्यावर पूर्ण कुटुंब चिंतेच्या छायेखाली होते, मात्र आत्मविश्वास आणि सकारात्मक प्रवृत्तीमुळे त्यांना परिस्थितीवर मात करण्यास मदत झाली. बडगलपूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र यांचे भाऊ लिंगगौडा आणि त्याचे कुटुंब 24 एप्रिला कोविड पॉझिटिव्ह आढळले. पण आता कुटुंबातील सर्व सदस्य बरे झाले असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.