५ भावंडांनी दिला रस्त्यावरील मुलांना आशेचा किरण; गिरवतायत शिक्षणाचे धडे - 5 brother teach to street children's in panjab
🎬 Watch Now: Feature Video
या मुलांना बघा. ते काही तरी लिहायचा प्रयत्न करतायेत. मात्र, दोन दिवसांपूर्वीपर्यंत त्यांना पेन्सिल कशी हातात धरायची हे देखील माहिती नव्हतं. त्रिपुराची राजधानी अगरतळाच्या या गल्लीत बरीच मुलं आहेत. जी कधीच शाळेत गेली नाहीत. यापैकी बरेचजणं मजुरी करतात. ते जेवढे पैसे कमावतात. ते कसे मोजायचे हे देखील त्यांना माहिती नाही. मात्र, अगरतळाच्या या गल्लीतील मुलांना एक नवा आशेचा किरण गवसलाय. रस्त्यावरील या मुलांना एका परिवारातील पाच भावंडांनी मिळून शिकवण्याचं ठरवलयं. त्यांनी बटाला परिसरातील उड्डाणपुलाखाली या मुलांसाठी वर्गदेखील भरवायला सुरुवात केलीय. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांसाठी मुलभूत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना शालेय शिक्षणासाठी तयार करता येईल. नुकतेच पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या जयंत यांनी सांगितलं. या मुलांच्या आई-वडीलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.