अॅमेझॉनवरून मागवला Mac book.. पार्सलचा बॉक्स उघडताच निघाला पेपरचा बंडल.. - मॅक बुकच्या ऐवजी मिळाला पेपरचा बंडल
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद : एका तरुणाने अॅमेझॉनवर मॅक बुकची ऑर्डर दिली ( Ordered Mac-book From Amazon ) होती. मात्र ज्यावेळी कुरियरद्वारे त्याला बॉक्स मिळाला त्यावेळी त्यामध्ये पेपर बंडल असल्याचे ( Got Paper Bundle Instead of Mac Book ) आढळले. कुकटपल्ली येथील यशवंतने अॅमेझॉनवर एक लाख रुपयांचे मॅक बुक ऑर्डर केला होता. त्याला मंगळवारी अॅमेझॉनवरून पार्सल मिळाले होते. ते पार्सल उघडत असताना त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला. पार्सलमध्ये मॅक बुक ऐवजी कागदाचे बंडल पाहून त्याला धक्काच बसला. त्याने हा व्हिडिओ मेलमध्ये जोडला आणि तो अॅमेझॉनचे सीईओ आणि ई-कॉमर्स वेबसाइटच्या इतर अधिकाऱ्यांना पाठवला होता. मात्र त्यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर यशवंतने सायबराबाद सायबर क्राईम पोलिसात ( Cyberabad Cyber Crime Police ) जाऊन तक्रार दाखल केली. सायबराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST