Muktidham Temple Rangoli Video : नाशकातील मुक्तीधाम मंदिरात तब्बल 300 किलो रंग वापरून साकारली भव्य रांगोळी - नाशिक येथील मुक्तीधाम मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - हिंदू नववर्षाचे स्वागत सकाळपासूनच ठिकठिकाणी स्वागत यात्रा काढत ढोल ताशांच्या गजरात करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. नाशिकरोड येथील मुक्तीधाम मंदिराच्या ( Muktidham temple in Nashik ) प्रांगणात भव्य अशी रांगोळी यावेळी साकारण्यात आली ( Muktidham Temple Rangoli ) होती. तब्बल विविध रंगाची 300 किलो रांगोळी वापरण्यात आला असून 30 बाय 75 फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने 2 वर्षांपासून येथे रांगोळी साकारण्यात आली नव्हती, मात्र आता सर्व निर्बंध उठल्याने यावेळी मात्र भव्य स्वपरूपात गुडीपाडवा साजरा करण्यात आली आहे. या रंगोळीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याने आझादी का अमृतमहोत्सव या संकल्पनेच्या आधारावर रांगोळी साकारण्यात आली आहे. यामध्ये भारतासाठी लढणाऱ्या वीरांगणांचे चित्र साकारण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्य यज्ञाकुंडातील स्वातंत्र्य वीरांगना यांची नावे साकारण्यात आली होती. ही भव्य अशी रांगोळी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच मुक्तीधममंदिरात गर्दी केली होती. ही रांगोळी साकारण्यासाठी नाना पाटील, गोपालजी लाल, संजय जाधव, सुरेश जठार यांच्या मार्गदर्शनाखाली 30 महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पूजा अष्टेकर, सारिका मंचेकर, नलिनी कड, प्रणिता पडू, प्रतीक्षा वरडे, योगिता बारपत्रे, वैशाली गवळी, मंदा मुदलियार, सीमा कासलीवाल, मनिषा पडवळ आदींसह 30 महिलांनी ही रांगोळी काढण्यासाठी परिश्रम घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST