VIDEO : निफाडच्या शिंगवे येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद - leopard in niphad
🎬 Watch Now: Feature Video
निफाड ( नाशिक ):- निफाड तालुक्यातील शिंगवे येथील उस उत्पादक शेतकरी सुकदेव रोडीबा डेर्ले या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा बिबटया जेरबंद झाला आहे. हा बिबट्या अंदाजे तीन वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाने दिली असून या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेत निफाड येथील नर्सरीत बिबट्याला आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. या परिसरात अजून बिबटे असल्याने वनविभागाने पिंजरे लावून हा परिसर बिबटे मुक्त करावा अशी मागणी नागरिक व शेतकरी वनविभागाकडे करत आहे .
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST