Shivsena NCP Workers Joined BJP : मुंबईत भाजपचा शिवसेना, राष्ट्रवादीला झटका.. कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश - शिवसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 10, 2022, 7:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई : मुंबईतील कांदिवली वेस्ट कंट्री क्लब ( Kandivali West Country Club ) येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश ( Shivsena NCP Workers Joined BJP ) केला. उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी ( BJP MP Gopal Shetty ) यांनी भाजपमध्ये सर्वांचे स्वागत केले. प्रवेश घेतलेल्या बहुतेक महिला होत्या. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत महिला आणि पुरुषांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ परिधान करून खासदार गोपाळ शेट्टी यांनी आशिष मांडवीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. गोरगरिबांच्या हितासाठी काम करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे, समाजासोबत काम करणे हे आपले ध्येय असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले. खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, आमच्या उपनगरात ४ बांधकाम व्यावसायिक आहेत. ज्यांनी अनेक वर्षांपासून एसआरएचे काम बंद केले आहे. त्यामुळे लोकांना घर मिळत नाही. बिल्डर्स एसआरएचे काम 2-3 वर्षांपासून रोखून धरतात. तसेच अनेक बिल्डरांची नावे घेत आता आम्ही स्वतः पुढे येऊन परिसराची विकासकामे करून घेऊ, असे सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.