Abdul Sattar On Raosaheb Danve : 'उलटा चोर कोतवाल को डाँटे, अशी दानवेंची अवस्था' - abdul sattar marathi news
🎬 Watch Now: Feature Video
जालना - महाविकास आघाडीतील 25 आमदार भाजपात येतील, असा गौप्सस्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल ( शुक्रवार ) केला होता. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. परंतु, ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील, असेही दानवे यांनी म्हटलं होते. त्यावर आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले ( Abdul Sattar On Raosaheb Danve ) आहे. भाजपाचेच नाराज आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटे बोलत आहेत. भाजपाचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करतील, असा दावाही सत्तार यांनी केला आहे. तसेच, उलटा चोर कोलवाल को डाँटे, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी दानवेंची खिल्ली उडवली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST