2 operations by Anti Narcotics Cell : अमली पदार्थ विरोधी कक्षाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई; कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त - पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 29, 2022, 10:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

मुंबई - अंमली पदार्थ विरोधी कक्षाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई केली आहे. पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने ( Anti Narcotics Cell Worli unit ) केली आहे. या युनिटने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन व्यक्तींकडून एकुण ३ किलो १० ग्रॅम वजनाचा व ४,५१,५०,००० किंमतीचा मेफेड्रॉन ड्रग जप्त केला आहे. शामसुल्लाह ओबेदुल्ला खान, ( वय ३९ वर्षे, रा. लव्हली होम को. ऑ. हौ. सोसा., वैशाली एस. व्ही. रोड, जागेश्वरी (प), मुंबई नगर ), आयुब इझहार अहमद शेख ( वय ३२ वर्षे, रा. ठि. प्लॉट नं. ४४, नाईन नं. एन. शिवाजीनगर गोवंडी मुंबई ) अशी आरोपींची नावे आहेत. दुसरी कारवाई अंमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिटमार्फत ( Anti Narcotics Cell Bandra Unit ) करण्यात आली. बांद्रा युनिट ने एम.डी (मेफेड्रॉन) या अंमली मुंबईत पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एकुण १५० ग्रॅम एम.डी.सह (मेफेड्रॉन) अटक केली आहेत. त्याची किंमत अंदाजे २२ लाख ५० हजार- रुपये सांगितली जात आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे ( DCP Datta Nalawade ) यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.