सचिन वाझे यांना माफीचा साक्षिदार करायचे की नाही हा न्यायालयाचा अधिकार - ज्येष्ठ कायदेतज्ञाचे मत - apology Witness Sachin Waze
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14449407-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कथित वसुलीचे आरोप लावल्यानंतर या प्रकरणाचा तपास अनेक एजन्सींमार्फत होत आहे. ईडी देखील या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करत असून, मागील वर्षी 2 नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना अटक केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये आहे. याच प्रकरणाशी संबंधित आरोपी सचिन वाझे यांनी ईडीला पत्र पाठवून माफीचा साक्षीदार होण्यासंदर्भात विनंती केली आहे. मात्र, कायद्याच्या कसोटीत प्रकरणातील एखाद्या आरोपीला अशाप्रकारे माफीचा साक्षिदार होता येतो का? या संदर्भात आम्ही कायदेतज्ञ कनिष्क जयंत यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, जर एखाद्या आरोपीने अशाप्रकारे माफीचा साक्षिदार होण्याकरिता अर्ज केला असला तरी तो अर्ज स्वीकारण्याचा अधिकार कुठल्याही तपास यंत्रणेला नसून त्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या न्यायाधीशाचा अधिकार असतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST