Raghunath Kuchik : शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारी पीडित तरुणी ईटीव्ही भारतवर.. पहा धक्कादायक खुलासे - शिवसेना नेते रघुनाथ कुचीक
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचीक ( Shivsena Leader Raghunath Kuchik ) यांच्यावरती काही दिवसापूर्वी एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करत गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्या पीडित महिलेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर ती तरुणी बेपत्ता देखील झाली होती. पण अखेर आज ती तरुणी माध्यमांसमोर आली ( Raghunath Kuchik Rape Case Victim Girl ) आहे. आज ईटीव्ही भारतशी संवाद साधताना त्या पीडित तरुणीने अनेक धक्कादायक खुलासे करत तिच्या सोबत नेमकं काय घडलं हे पूर्ण स्पष्ट केल आहे. एकूणच या प्रकरणी संपूर्ण माहिती घेत त्या तरुणीशी संवाद साधला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST