Swabhimani Shetkari Sanghatana : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुंडन आंदोलन - Swabhimani Sanghatana Agitation in Washim

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 4, 2022, 8:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

वाशिम - शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी रिसोडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ( Swabhimani Shetkari Sanghatana ) मुंडन आंदोलन ( Mundan Agitation in Washim ) केले आहे. शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी गेल्या 10 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. राजू शेट्टींच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना ( Swabhimani Sanghatana Agitation in Washim ) आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाशिमच्या रिसोड महावितरण कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. 12 वीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा त्रास होऊ नये, म्हणून मुंडन आंदोलन केले असल्याचे स्वाभिमानीकडून सांगण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.