Ranger Injured in Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी जखमी - बिबट्याच्या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी जखमी
🎬 Watch Now: Feature Video
ऋषिकेश ( उत्तराखंड ) - मीरा नगर येथील नंदकिशोर त्यागी यांच्या घरात बिबट्या शिरल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर बिबट्याला शोधून पकडण्याचे काम सुरू असताना बिबट्याने एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला चढवला. त्यांना जखमी अवस्थेत ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. ललित मोहन नेगी, असे त्यांच नाव आहे. एका घरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच ते आपल्या पथकासह त्या ठिकाणी पोहोचले. सर्वत्र बिबट्याचा शोध सुरू होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर त्या भागातील नागरिकांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढून जवळ असलेल्या शेतात लपला आहे. वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST