VBA Protest Against Fertilizer Price Hike : खतांचे दर वाढण्याची शक्यता.. वंचित बहुजन आघाडीचे 'पुंगी बजाव' आंदोलन - पुंगी बजाओ आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - संभाव्य खत दरवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाओ आंदोलन करण्यात ( VBA Protest Against Fertilizer Price Hike ) आले. खत दरवाढ होऊ देऊ नये, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुंगी वाजवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून टाकला होता.
युक्रेन रशियाच्या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यादृष्टीने देशामध्ये खत दरवाढ युद्धामुळे होउ शकतो. त्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने यासाठी पुंगी बजाव आंदोलन केले. युद्धामुळे होणारी खत दरवाढ होऊ देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला होता.
केंद्र सरकार विरोधात वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली. हे आंदोलन महासचिव अरुंधतीताई शिरसाट, युवक आघाडीचे प्रदेश सचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST