CCTV of Woman falls into manhole : रस्त्यावर चालताना मोबाईलवर बोलणे महागात... महिला कोसळली मॅनहोलमध्ये! - Woman falls into manhole
🎬 Watch Now: Feature Video
पाटणा - बिहारची राजधानी पाटणामध्ये महापालिकेचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. पाटना महापालिका कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावरील मॅनहोलमध्ये ( Woman Fell In Manhole In Patna ) एक महिला पडली. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर लोकांनी महिलेला मॅनहोलमधून बाहेर काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाटणा शहरातील आलमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील ( Patna City Alamganj Police Station ) जल्ला रोडवरील महिला महादेवजवळ ही घटना घडली.
महिलेला फोनवर पडले बोलणे महागात - पाटना शहरातील आलमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जल्ला रोडवरून जाणाऱ्या महिलेला फोनवर बोलणे महागात पडले. फोनवर बोलत असताना ती उघड्या गटाराच्या मॅनहोलमध्ये पडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद ( Woman Fell manhole CCTV ) झाली आहे. फोनवर बोलत असताना महिला गटाराच्या मॅनहोलमध्ये कशी पडली हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते. सर्वांनी मिळून महिला आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST