बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नं त्यांच्या स्पॅडेक्स मिशन कार्यक्रमाचं डॉकिंग पुढं ढकलण्याची घोषणा केली आहे. हे डॉकिंग सुरुवातीला 7 जानेवारी 2025 रोजी होणार होतं. 9 जानेवारी 2025 साठी पुन्हा डॉंकिंग होणार आहे. इस्रोनं वेळापत्रक बदलण्याचं कोणतंही विशिष्ट कारण दिलेलं नाही.
The SpaDeX Docking scheduled on 7th is now postponed to 9th.
— ISRO (@isro) January 6, 2025
The docking process requires further validation through ground simulations based on an abort scenario identified today.
Stay tuned for updates.
काय म्हणालं इस्त्रो?: ISRO ने एका संदेशात म्हटलं आहे की, "डॉकिंग ऑफ स्पॅडेक्स मिशन प्रायोगिक कार्यक्रम गुरुवार, 09 जानेवारी 2025 पर्यंत पुढं ढकलण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या वेळ नंतर कळवण्यात येतील." या गैरसोयीबद्दल इस्रोनं खेद देखील व्यक्त केलाय, परंतु वेळापत्रक पुढं ढकलण्याचं कारण स्पष्ट केलं नाही. दरम्यान, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंग यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की SpaDeX मोहिमेला भारतीय डॉकिंग तंत्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे, कारण ते पूर्णपणे स्वदेशी मिशन आहे. या संबंधित भारत डॉकिंग तंत्रज्ञानाचा असा पहिलाच प्रयोग करत आहे.
पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान : केंद्रीय राज्यमंत्री पुढं म्हणाले की, SpaDeX चे मिशन पंतप्रधान मोदींच्या "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेशी निगडीत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिंग म्हणाले, "SpaDeX मिशनचं प्रक्षेपण हा भारतानं आतापर्यंत हाती घेतलेल्या पहिल्या प्रयोगांपैकी एक आहे. डॉकिंग तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच त्याला भारतीय डॉकिंग तंत्रज्ञान असं नाव देण्यात आले आहे.
30 डिसेंबर रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं SpaDeX आणि नाविन्यपूर्ण पेलोडसह PSLV-C60 लाँच करून ऐतिहासिक कामगिरी केली होती. SpaDeX मिशन हे PSLV नं प्रक्षेपित केलेल्या दोन लहान अंतराळयानांचा वापर करून इन-स्पेस डॉकिंगच्या प्रात्यक्षिकासाठी एक किफायतशीर तंत्रज्ञान मिशन आहे. SpaDeX मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट लो-अर्थ वर्तुळाकार कक्षेत दोन लहान अंतराळयानांचं डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं आहे.
हे वाचलंत का :