नवी दिल्ली Team India Next Test : भारतीय क्रिकेट संघानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली. ज्यात भारतीय संघाला 1-3 नं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या मालिकेतील पराभवामुळं भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यानंतर आता भारतीय संघ पुढचा कसोटी सामना कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून आहे.
Nothing but pure admiration from the skipper for his boys 🤩#WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/RJu6HstS7J
— ICC (@ICC) January 5, 2025
भारताचा लाजिरवाणा पराभव : कांगारुंविरुद्धची कसोटी मालिका भारतीय चाहत्यांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. या मालिकेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू फ्लॉप होताना दिसले. मालिकेत खराब फॉर्ममुळं कर्णधार प्लेइंग 11 मधून बाहेर झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू होता ज्यानं या मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि टीम इंडियाच्या पराभवानंतरही त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. यासह टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलमध्ये आपले सर्व सामने खेळले आहेत.
कधी होणार भारताचा सामना : भारतीय संघाचे खेळाडू आता काही महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील चक्रात उतरणार आहे. जिथं 20 जूनपासून कसोटी मालिकेचं आयोजन केलं जाईल. ही कसोटी मालिका इंग्लंड संघाविरुद्ध खेळली जाणार आहे. या मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. जे 20 जून ते 04 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. ही मालिका WTC 2025-27 सायकलचा भाग असेल. या मालिकेसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
The #WTC25 finalists are 🔒 in after Australia’s commanding series win over India.#AUSvIND | More here 👉 https://t.co/Vkw8u3mpa6 pic.twitter.com/1kt6BSkOFj
— ICC (@ICC) January 5, 2025
भारताचं वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना - 20 ते 24 जून (हेडिंग्ले, लीड्स)
- दुसरा कसोटी सामना - 02 ते 06 जुलै (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
- तिसरा कसोटी सामना 10-14 जुलै (लॉर्ड्स, लंडन)
- चौथा कसोटी सामना - 23 ते 27 जुलै (एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
- पाचवा कसोटी सामना - 31 जुलै ते 4 ऑगस्ट (केनिंग्टन ओव्हल, लंडन)
इंग्लंडमध्ये गेल्या वेळी भारताची कामगिरी कशी होती : टीम इंडियानं शेवटचा इंग्लंडचा दौरा 2021 मध्ये केला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. त्या मालिकेतील शेवटचा म्हणजेच 5 वा सामना 2022 मध्ये कोरोना महामारीमुळं खेळला गेला नव्हता. परणामी या मालिकेचा निकाल 2-2 असा बरोबरीत सुटला. या मालिकेनंतर भारतानं कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केलेला नाही. त्या मालिकेत भारतीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होतं.
हेही वाचा :