MP Vinayak Raut ज्योतिषी म्हणाला फक्त दोन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक- खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका - विनायक राऊत
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी गद्दार लोकांनी चांगले उद्योग Vinayak Raut criticized CM करावे. बेरोजगारांना काय हवे आहे, शेतकऱ्यांना काय हवे आहे. त्यांची विचारपूस करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, उद्योगमंत्र्यांना वेळ नाही. परंतु जोतिषाकडे जायला वेळ आहे. जोतिषाकडे जायचे, हात दाखवायचा बघा माझी रेषा सरळ आहे का, मग ज्योतिषी म्हणाला तुमची लाभ रेषा संपत आली आहे फक्त दोन महिन्याचा कार्यकाळ शिल्लक आहे. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत MP Vinayak Raut यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Ekanath Shinde आणि सरकारवर केली आहे. ते काल चिपळूणमध्ये बोलत होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले, कामाख्या देवी देखील अशा या पापी लोकांना फारकाळ अभय देणार नाही. कारण सत्याच्या मार्गाने शिवसेना चाललेली आहे. आणि वाममार्गाने भाजप शिंदे सरकारला चालवत आहे. त्यामुळे अशा या बदमाश आणि बेईमान लोकांना महाराष्ट्रात आणि देशात राहण्याचा अधिकार नाही अशी टीका यावेळी राऊत यांनी criticized CM Ekanath Shinde केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST