एकनाथ शिंदेंची पक्षाला गरज, पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक विचार करावा - गुलाबराव पाटील - मंत्री गुलाबराव पाटील
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळापासून सेनेत आहेत. त्यांची पक्षाला गरज आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे शिवसेना नेते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील ( Minister Gulabrao Patil On Minister Eknath Shinde ) यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे नाराज असून शिवसेनेच्या डझनभर आमदारांना घेऊन गुजरात सुरतमध्ये दाखल झाले. राजकीय घडामोडींना यामुळे वेग आला आहे. शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींवर ही नाराजी असल्याचे बोलले जाते. कट्टर शिवसैनिक, शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST