Ambabai Silver Jewellery: अंबाबाईच्या चांदीच्या दागिन्यांना झळाळी; सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता - कोल्हापूर नवरात्र तयारी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : दरवर्षी कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव (Ambadevi Navratri Festival Kolhapur) पार पाडतो. यावर्षी कोरोनानंतर मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव पार पडणार आहे. येत्या 26 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर तयारीला आता वेग आला आहे. मंदिराच्या कळसाबरोबरच गाभाऱ्याची सुद्धा स्वच्छता पूर्ण झाली आहे. आता अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता (Kolhapur Ambabai Jewelery Cleaning) सुरू असून आज सुरुवातीला चांदीच्या दागिन्यांसह पालखीला झळाळी देण्याचे काम पार पडले. उद्या याच पद्धतीने सोन्याच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम करण्यात येणार असून लवकरच तयारी पूर्ण होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST