Aurangabad flood : दुदैवी....! पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू, परिसरात शोककळा - Aurangabad Heavy Rain
🎬 Watch Now: Feature Video

Aurangabad flood : औरंगाबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला आहे. बाजार सावंगी येथे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. अग्निशमन आणि आणीबाणी पथकाकडून 3 तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला आहे. बाजार सावंगी येथील तरुण भाऊसाहेब कारभारी नलावडे पुरात वाहून गेला होता. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. जोरदार पावसाने बाजार सावंगी येथील धांड नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने युवक पाण्यात पडला. आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST