Nagpur Grand Marathon : नागपूर महामॅराथॉनमध्ये 'भेदभाव सोडा' असा संदेश देत धावल्या मायलेकी - Nagpur Grand Marathon
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : नागपुरात महिलांसाठी खास जागतिक महिला दिन 2022 ( World Women's Day 2022 ) वर आधारित ब्रेक बायस म्हणजेच भेदभाव सोडा, हा संदेश देणारी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी संविधान चौकातून खास आयोजन करण्यात आले. यामध्ये महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिला पुरुष भेदभाव समाजातून नाहीसा व्हावा ( Don't discriminate between men and women ) हा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. कोरोना काळानंतर झालेल्या या स्पर्धेत हजारो महिला आणि लेकिनी सहभाग घेऊन आपला आनंद साजरा केला. चार भिंती सोडून प्रत्येक क्षेत्रात महिला आपले स्थान आणि ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेत हजारोच्या संख्यने आई आणि मुली उत्साहाने सोबत धावल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात पाच, तीन आणि दोन किलोमीटर अशा तीन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST