शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली तेव्हाच संपली -चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil Against Shiv Sena
🎬 Watch Now: Feature Video

जळगाव - शिवसेना एमआयएमसोबत गेली तर त्यामध्ये आम्हाला काही आश्यर्य वाटणार नाही. कारण स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या काळात राष्ट्रवादीसह, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर जहरी टीका केलेली आहे. त्यांचे यांच्याशी राजकीय मतभेत कायम राहीले आहेत. तर, दुसरीकडे अल्पसंख्यांबद्दल तर बाळासाहेब जास्तच आक्रमक होते. (Chandrakant Patil criticism of Shiv Sena ) त्यामुळे एमआयएमसोबत शिवसेना जाणार यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत शिवसेना गेली तेव्हाच ती संपली आहे, अशी थेट टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST