Veer Dajiba Miravnuk : नाशिकमध्ये मानाच्या दाजीबा वीरांच्या मिरवणुकीत भाविकांचा उत्साह
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - कोरोनानंतर दोन वर्षांच्या खंडानंतर शनिवारी पारंपरिक दाजीबा विराच्या मिरवणुकीत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला होता. तब्बल दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या दाजीबा वीरांची मिरवणूक हे नाशिकचे आकर्षण आहे. नवसाला पावणारा वीर अशी दाजीबा अशी ओळख आल्याने दाजीबा वीर मिरवणुकीत नाशिककर मोठया उत्साहाने सहभागी होतात. यावेळी मनातील इच्छा दाजीबा वीरापर्यंत पोहचवण्यासाठी बाशिंग, पाळणा व नारळ मिरवणुकीत अर्पण केले जाते. यंदाच्या वर्षी प्रवीण भागवत यांना मिरवणूकीचा मान देण्यात आला.दाजीबा महाराज गाई गुरे चरण्यासाठी बाहेर जायचे. या दरम्यानच्या त्यांचे लग्न ठरलं, हळद लागली होती. ते गाई गुरे चारण्यासाठी गेले असता दरोडेखोरांनी दागिने सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने दाजीबांवर वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. खंडेराव नावाचा श्वानाने मालकाला पाहताच गावकऱ्यांना सांगितले. व तेथे दाजीबांना अग्निडाग दिला. तेथे श्वानाने व दाजीबा महाराजांच्या भावी पत्नीने देखील त्या अग्नीत उडी मारली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST