VIDEO : रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी - Ajit pawar taken officers attendence
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. ( Ajit Pawar on Ratnagiri Visit ) सकाळी आठ वाजता त्यांचं खेडमध्ये आगमन झालं. त्यानंतर भरणे येथे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठक सुरू झाली आहे. ही आढावा बैठक सुरु होण्यापुर्वी अजित पवार यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. ( Ajit Pawar Take Officers Attendence Ratnagiri ) कोणता अधिकारी बैठकीला हजर राहिलेला नाही, याची हजेरी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. या आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अडचणी संदर्भात त्यांनी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव यांना फोन करून संबंधित विभागाच्या अडचणी दूर करण्यासाठी फोन केला आणि त्यांनी अडचणी सोडवाव्यात, असे निर्देश दिले. ऑन द स्पॉट निर्णयामुळे अजित पवार ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST