VIDEO : भरउन्हात पाण्यासाठी हरणांची भटकंती; ममदापूर वनक्षेत्रातील पाणवठे झाले कोरडेठाक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 4, 2022, 3:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

येवला (नाशिक) - उन्हाची दाहकता वाढत असून वन्य प्राण्यांना रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ( Deer Roaming for Water in Yeola Nashik ) येत आहे. येवला तालुक्यातील ममदापूर वनक्षेत्रातील हरणांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाणवठे बांधण्यात आले असून हे पाणवठे कोरडेठाक झालेले असल्याने यात पाणी टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात वनक्षेत्र असून मोठ्या प्रमाणात हरणाची संख्या या ठिकाणी आहे. याकरीता वन्यप्राण्यांना तहान भागावी या करीता पाण्यासाठी पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र ममदापूर वनक्षेत्रात पाणवड्यामध्ये ( Nashik Mamdapur forest area ) सध्या पाणी नसल्याने उन्हाच्या तडाक्यामध्ये अक्षरशः हरणांसह इतर वन्यप्राण्यांना पाण्याकरता भटकंती करण्याची वेळ येत असल्याने कोरडेठाक पडलेले असल्याने या पानवड्यामध्ये वनविभागाने पाणी टाकावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.