Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंधावर निलोफर खानचे उत्तर; म्हणाल्या, प्रत्येक मुसलमानाला... - नवाब मलिक अटक मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्राचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व नवाब मलिक यांना ईडीने अटक केली ( Nawab Malik Arrested ) आहे. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीतील सारेच पक्ष भाजपावर तुटून पडत आहे. तर भाजपाकडून अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालणार का, असा प्रश्न विचारला जातोय. त्याला आता नवाब मलिक यांच्या मुलगी निलोफर खान यांनी उत्तर दिले आहे. का, प्रत्येक मुसलमानाला अंडरवर्ल्डशी जोडले जाते. प्रत्येक मुसलमानला स्वत्रंतपणे जगण्याचा हक्क नाही आहे का?, असा सवाल निलोफर खानने विचारला आहे. तसेच, नवाब मलिक यांना ईडीने चुकीच्या पद्धतीने नेण्यात आले. एक मुलगी म्हणून लढायला तयार आहे, असेही निलोफर खान प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाली. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST