देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल - chikhali police
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड ( पुणे ) - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलिसांकडून अज्ञाताचा शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस येत होते. तेव्हा हा प्रकार घडला होता. या घटनेआधी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तुफान घोषणाबाजी झाली होती. त्यावेळी अनेक सामान्य नागरिकही उपस्थित होते. त्यामुळे चप्पल फेकणारी ती व्यक्ती कोण आणि त्याचा यामागचा हेतू काय होता, हे समजू शकलेले नाही. त्यांच्या अटकेनंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST