ठाणे - मध्य रेल्वेच्या प्रवाशांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपींनी एका प्रवाशाला रेल्वेत सीट देण्याचा बहाणा करून विद्याविहार रेल्वे स्थनाकात घेऊन गेले. त्याठिकाणी प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोकड आणि वस्तू घेऊन पसार झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे त्या दोन्ही गुन्हेगारांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. नदीम शहा आणि मुकेश पिंपळीसकर अशी आरोपींची नावे आहेत.
शिवकुमार यादव याला बिहारला जायचे असल्याने तो ट्रेन पकडण्यासाठी शुक्रवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आला. त्यावेळी कल्याण तिकीट बुकिंग ऑफिसजवळ उभा असतानाच दोघे तरुण शिवकुमारच्या जवळ आले. शिवकुमारला सांगितले की, तू आमच्या सोबत विद्याविहार रेल्वे स्थनाकात चल तिथून बिहार जाणारी मेल-एक्स्प्रेसमध्ये बसायला जागा मिळेल. यादवने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह विद्याविहार रेल्वे स्थनाकात गेला. मात्र स्थानकालगत निजर्नस्थळी नेऊन यादव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि वस्तू घेऊन पसार झाले होते.
गुन्हेगारांचा १८ तसाच बेड्या -
या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात यादव याने तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही गुन्हेगारांचा केवळ १८ तसाच शोध घेऊन नवपाडा भागातून आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन्ही सराईत गुन्हेगार असून या आरोपींनी आणखी किती प्रवाशाला लुटले ? याचा तपास सुरू केला.