ETV Bharat / state

ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल, कारवाईची मागणी

author img

By

Published : Apr 14, 2020, 11:10 PM IST

ठाणे शहरातील सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी योग्य उपाययोजना होत नसल्याने डॉ. केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

Bad condition of quarantine patients in Thane
ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे हाल, कारवाईची मागणी

ठाणे - कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाण्यात संशयित रूग्णांसाठी क्वारंटाईन केंद्र उभे करण्यात आले आहेत. येथे डॉ.केंद्रे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या रूग्णांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. या संदर्भात डॉ. केंद्रे यांच्याशी संपर्क साधूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची माहिती विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दिली.

मिलिंद पाटील, माजी विरोधी पक्ष नेते

ठाणे शहरातील सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये अनेक संशयित रूग्णांना ठेवण्यात आले आहे. कळवा परिसरातील चार जणांना या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. सिव्हील रूग्णालयात ठेवण्यात आलेल्या एका रिक्षाचालकाच्या स्वॅबचा नमुना १२ दिवसांपूर्वी नेण्यात आला असून अद्याप त्याचा अहवाल देण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीलाही क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्या दुधाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथील स्थानिक नगरसेवकाकडून या मुलीला दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर या क्वारंटाईन रुग्णांना नाश्तादेखील दुपारी १२ वाजता देण्यात येत आहे.

दुसरीकडे, पातलीपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कळव्यातील दोन मुली आहेत.या ठिकाणीही अहवाल येत नसल्याने त्यांना नाहक अडकून पडावे लागले आहे. या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे सर्वत्र अंधार दाटत असल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींच्याही जेवणाखाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सदर रूग्णांनी ही माहिती आपणाला दिल्यानंतर आपण डॉ. केंद्रे यांना त्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी केली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.