ETV Bharat / state

साताऱ्यात विवाहितेचा विनयभंग; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 6, 2020, 11:04 PM IST

आरोपी जितेंद्रची एका 37 वर्षीय महिलेसोबत ओळख होती. तिला तो २०१४ पासून वारंवार त्रास देत होता. या प्रकरणी त्याच्यावर शाहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाणे
शाहूपुरी पोलीस ठाणे

सातारा - एका पोलीस कर्मचाऱ्याने विवाहितेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जितेंद्र निवृत्ती कांबळे (रा. शाहूपुरी, दत्त पंचशील कॉलनी, सातारा) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मेढा पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जितेंद्रची एका 37 वर्षीय महिलेसोबत ओळख होती. तिला तो २०१४ पासून वेळोवेळी त्रास देत होता. ही महिला एकटी चालत निघाली असताना पाठीमागून मोटारसायकलवर येऊन तो जवळ थांबला. 'तुमचे मालक बाहेर असतात. आपण कुठेतरी फिरायला जाऊ. कोणालाही कळणार नाही. तुला भिती वाटत असेल तर तोंडाला रुमाल बांधून जाऊ' असे तो म्हणाला. यानंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - अहो आश्चर्यम..! समृद्धी महामार्गात चक्क जमीन गेली चोरीला, शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.