ETV Bharat / bharat

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याकडून पुत्राची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती, आज होणार शपथविधी सोहळा - Udhayanidhi Appointed Deputy CM - UDHAYANIDHI APPOINTED DEPUTY CM

Deputy CM Udhayanidhi Swearing Ceremony : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पुत्र उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली आहे. उदयनिधी यांचा शपथविधी सोहळा आज (29 सप्टेंबर) पार पडणार आहे.

udhayanidhi stalin appointed deputy  CM of Tamil Nadu swearing ceremony on 29 september 2024
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 8:08 AM IST

Updated : Sep 29, 2024, 2:19 PM IST

चेन्नई : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी शनिवारी (28 सप्टेंबर) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या शिफारशी मंजूर केल्या. यात त्यांचा मुलगा उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती आणि व्ही सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळात घेणे समाविष्ट आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं मनी लाँड्रिंग प्रकरणात सेंथिल बालाजी यांना जामीन मंजूर केला होता.

आज होणार शपथविधी सोहळा : राजभवनातील प्रसिद्धीपत्रानुसार, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या राज्यपालांना युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री थिरू उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या विद्यमान खात्यांव्यतिरिक्त नियोजन आणि विकास खात्याचं वाटप करण्याची आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. राज्यपालांनी या शिफारशींना मान्यता दिली आहे. आज (29 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार आहे.

उच्च शिक्षण मंत्री डॉ के पोनमुडी यांना वनमंत्री करण्यात आलं आहे. तर व्ही. मय्यानाथन यांना मागासवर्गीय कल्याण आणि विमुक्त समुदाय कल्याण मंत्री करण्यात आलं आहे. याशिवाय एन. कायलविझी सेल्वराज यांना मानव संसाधन व्यवस्थापन आणि माजी सैनिक कल्याण मंत्री आणि डॉ. एम. मथिवेन्थन यांना वनमंत्री, द्रविड आणि आदिवासी कल्याण मंत्री करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय कल्याण मंत्री आरएस राजकन्नप्पन यांना दूध आणि दुग्धविकास आणि खादी आणि ग्रामोद्योग मंत्री करण्यात आलं आहे. तर अर्थ आणि मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री थंगम थेनारासू यांना वित्त आणि पुरातत्व विषयांव्यतिरिक्त वित्त, पर्यावरण आणि हवामान बदल, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हवामान बदल मंत्री करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. मंत्री असो की सामान्य माणूस परिणाम माहित असणं आवश्यक- सर्वोच्च न्यायालयाचे उदयनिधी यांच्यावर ताशेरे
  2. सनातन धर्मावरील वक्तव्यावर उच्च न्यायालयाची नाराजी! मात्र, उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रीपदावरून हटवण्यास नकार
  3. भाजप सरकार जातीयवादी आणि भ्रष्टाचारी, उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपावर हल्ला

Last Updated : Sep 29, 2024, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.