बेरूत- लेबेनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहच्या मृत्यूची दहशतवादी संघटनेनं पुष्टी केली आहे. याआधी इस्रायली संरक्षण दलानं (आयडीएफ) हिजबुल्ला प्रमुखाची हत्या केल्याचा दावा आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी उशिरा बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर दहेह येथील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात नसराल्लाह मारला गेला.
हिजबुल्लाहनं शुक्रवारी बेरूत येथे इस्रायलच्या हल्ल्यात त्यांचा नेता सय्यद हसन नसराल्लाहच्या मृत्यूची पुष्टी केल्याचे इराणच्या एका माध्यमानं म्हटलं आहे. यापूर्वी नसराल्लाह हे सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचा दावा इराणकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे हिजबुल्लाच्या स्थापनेत इराणनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. इराण नेहमीच हिजबुल्लाहला पाठिंबा दिला आहे.
- आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी नसराल्लाहच्या हत्येनंतर म्हणाले, "आम्ही दिलेला संदेश स्पष्ट आहे. इस्रायली नागरिकांसाठी धोका असलेल्या लोकांपर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहित आहे."
कोण होता नसराल्लाह?1982 मध्ये इस्रायलंनं लेबनॉनवर आक्रमण केल्यानंतर नसराल्लाहनं हिजबुल्लाची स्थापना केली. 1992 मध्ये त्यानं संघटनेचे नेते म्हणून पदभार स्वीकारून दहशतवादी संघटनेवर पूर्ण नियंत्रण ठेवलं. हिजबुल्लाच्या धार्मिक, लष्करी आणि सामरिक बाबींसाठी सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या शूरा परिषदेचाही तो अध्यक्ष होता. नसराल्लाहची हत्या हा हिजबुल्लाला मिळालेला सर्वात मोठा धक्का आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आणि इराणच्या मदतीनं हिजबुल्लाहनं आपली सैन्यदलाची क्षमता वाढली. इस्रायलच्या दाव्यानुसार दहशतवादी हसन नसराल्लाहनं 32 वर्षांच्या कार्यकाळात असंख्य इस्रायली नागरिक आणि सैनिकांच्या हत्येसाठी ठार केले. त्यानं जगभरातील हजारो दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केलं होते.
नाश करण्याच्या योजनेचा शिल्पकार- हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या अयातुल्ला राजवटीला इशारा दिला. "जे इस्रायलला लक्ष्य करतात, त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. इस्रायल पोहोचणार नाही, असे इराण किंवा मध्य पूर्वेतील कोणतेही ठिकाण नाही," असा इशारा देत इस्राययलच्या पंतप्रधानांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नसराल्लाहला 'इराणच्या दुष्टतेच्या अक्षाचे मुख्य इंजिन' असे संबोधले. "इस्रायलचा नाश करण्याच्या योजनेचा तो शिल्पकार होता," असा बेंजामीन यांनी आरोप केला.
अमेरिका इस्रायलला करणार मदत- हिजबुल्लाह प्रमुखाच्या मृत्यूमुळे दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली. "गेल्या अनेक दशकापांसून अमेरिका, इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी नसराल्लाह जबाबदार होता. हिजबुल्लाह, हमास, हौथी आणि इराणचे समर्थन असलेल्या इतर दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्यांपासून स्वसंरक्षणाच्या करण्याकरिता इस्रायलला मदत करणार आहे," असे सांगत अमेरिकेनं इस्रायलला समर्थन दिलं आहे.
हेही वाचा-