पुणे PM to inaugurate various projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (29 सप्टेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्रासाठी 11,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले "आज भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भाविकांना आपुलकीची भेट मिळाली आहे. सोलापूरला थेट हवाई जोडणी देण्यासाठी विमानतळाच्या अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. प्रवाशांसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे त्याची गती कमी होऊ नये, यासाठी आपण सक्रिय पावले उचलली पाहिजेत." पुढे पंतप्रधान म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी मला अनेक मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि पायाभरणीसाठी पुण्यात येण्याचे नियोजन होते. परंतु अतिवृष्टीमुळे मला तो कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे माझे नुकसान झाले आहे. कारण पुण्यात आल्यामुळे उत्साह येतो. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट सेक्शन मार्गावर आता मेट्रो सुरू होणार आहे."
#WATCH | Prime Minister Narendra Modi says " today, with the blessings of lord vitthal, his devotees have also received the gift of affection. the work of upgrading the airport has been completed to provide direct air connectivity to solapur. the capacity of the terminal building… pic.twitter.com/G9opHg8pr7
— ANI (@ANI) September 29, 2024
पुणे मेट्रोचं उद्घाटन : पंतप्रधान कार्यालयानं (पीएमओ) शनिवारी (28 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचं उद्घाटन केले. यासह पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प (फेज-1) पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी भागाची किंमत अंदाजे 1,810 कोटी रुपये आहे. पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट ते कात्रज विस्ताराची पायाभरणीदेखील पंतप्रधान मोदी करणार यांनी केली. यासाठी अंदाजे 2,955 कोटी रुपये खर्च येणार आहे. अंदाजे 5.46 किमीचा हा दक्षिण विभाग मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says " two days ago i had to come to pune for the inauguration and foundation stone laying of several big projects, but due to heavy rains i had to cancel that program. this has caused a loss to me because every particle of pune has… pic.twitter.com/KzJFuTyCb7
— ANI (@ANI) September 29, 2024
बिडकीन औद्योगिक क्षेत्र : राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 7,855 एकर क्षेत्र व्यापणारा बिडकीन औद्योगिक क्षेत्र आज पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहे. हे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेस 20 किलोमीटर अंतरावर आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पात मराठवाडा विभागातील एक वायब्रेंट इकोनॉमिक हब म्हणून प्रचंड क्षमता असल्याचं पीएमओनं म्हटले आहे. केंद्र सरकारनं 6,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पाला तीन टप्प्यांत विकासासाठी मंजुरी दिली आहे.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says " two days ago i had to come to pune for the inauguration and foundation stone laying of several big projects, but due to heavy rains i had to cancel that program. this has caused a loss to me because every particle of pune has… pic.twitter.com/KzJFuTyCb7
— ANI (@ANI) September 29, 2024
सोलापूर विमानतळाचं उद्घाटन : पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर विमानतळाचंदेखील आज उद्घाटन केले. ज्यामुळं कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि सोलापूर पर्यटक, व्यावसायिक कामांसाठी येणारे प्रवासी आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होईल. पीएमओच्या म्हणण्यानुसार, सोलापूरच्या विद्यमान टर्मिनल इमारतीचं वार्षिक सुमारे 4.1 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी नूतनीकरण करण्यात आलंय.
- दरम्यान, गुरूवारी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळं हा दौरा रद्द करावा लागला होता.
हेही वाचा -
- पावसाचा फटका! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द - PM Modi Pune Visit Cancelled
- मोदींचा दौरा पुढे ढकलल्यानंतर तापलं राजकारण, मेट्रो सुरू करण्याकरिता महाविकास आघाडीचं आंदोलन - pune metro inauguration
- भाजपाचा विदर्भावर 'फोकस'; लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळं पीएम मोदी, शाहांचे दौरे वाढले - Assembly Elections 2024