मैहर Maihar Road Accident : मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या बसची हायवा ट्रकला धडक झाली. या घटनेत सुमारे 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बसमध्ये अडकलेल्या मृतांचे मृतदेह बचाव मोहिमेद्वारे बाहेर काढण्यात येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हायवेवर भरधाव बसची धडक : मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील बस ही प्रयागराजवरून नागपूरकडं जात होती. तर हायवा ट्रक महामार्गावर उभा होता. भरधाव वेगानं जाणारी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवाला धडकली. या घटनेत बसमध्ये प्रवास करणाऱ्या सुमारे 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसंच 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात 3 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात मैहर जिल्ह्यातील नादान देहाट पोलीस स्टेशन परिसरात झाला.
मैहर दुर्घटनेत 9 ठार : घटनेची माहिती मिळताच, मैहर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीनं मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर बसमध्ये अडकलेल्या मृतांचे मृतदेह जेसीबी कटरच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात येत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेबाबत पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल म्हणाले की, "भरधाव वेगानं येत असलेली बस हायवा ट्रकला धडकली. या घटनेत 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झालाय. "
हेही वाचा -
- सातारा ठोसेघर मार्गावर भीषण अपघात, खड्डा चुकवताना दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, पाच जण गंभीर जखमी - Satara Road Accident
- प्रवासी बस पुलावरुन कोसळली नदीत; सेमाडोहमध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू, शिक्षकांचा समावेश - Bus Fell In River At Semadoh
- अंबेजोगाई-लातूर रोडवर कार-कंटेनरचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार - Ambejogai Latur road Accident