क्राइस्टचर्च NZ vs ENG 1st Test Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज 28 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल इथं खेळवला जाणार आहे.
Hear from the two skippers on the eve of a special Test Series!
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 27, 2024
Follow play in NZ LIVE during the Tegel Test Series with TVNZ DUKE, TVNZ+, Sport Nation NZ and The ACC. #NZvENG pic.twitter.com/MEJ7HGgXfF
दोन्ही संघांनी जाहीर केली प्लेइंग 11 : पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांनी त्यांची प्लेइंग 11 जाहीर केले आहेत. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडची कमान टॉम लॅथमच्या खांद्यावर आहे. तर केन विल्यमसन दुखापतीनंतर परतला आहे, याशिवाय डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेलसह अनेक अनुभवी खेळाडू प्लेइंग 11 चा भाग आहेत. तर इंग्लंडचं नेतृत्व बेन स्टोक्सकडे असेल. याशिवाय जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप यांसारखे स्टार खेळाडू खेळणाऱ्या संघाचा भाग आहेत.
इंग्लंडचं कडवं आव्हान : न्यूझीलंडचा संघ नुकताच भारताला त्यांच्याच घरातील कसोटी मालिकेत 3-0 नं पराभूत करुन पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडणार असून पहिल्या कसोटीत इंग्लंडला पराभूत करुन मालिकेत आघाडी घेण्यास संघाला आवडेल. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 नं गमावल्यानंतर इंग्लंड संघ येत आहे. अशा स्थितीत किवी संघाला त्यांच्याच घरात कडवं आव्हान द्यायला इंग्लंडला आवडेल.
The Crowe-Thorpe Trophy 🏆❤️ pic.twitter.com/PZ1wS6pKOO
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च
- दुसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
- तिसरा कसोटी सामना: 14-18 डिसेंबर, सेडन पार्क, हॅमिल्टन
England legend Graham Thorpe has been honoured in a new Crowe-Thorpe Trophy.
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
Part of the trophy is made up of the bat Graham used to score his first two centuries against New Zealand.
Graham's handwriting has been lifted off the face of his bat and inserted onto the trophy ❤️
पिच कशी असेल : क्राइस्टचर्चच्या मागील रेकॉर्डनुसार या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा झाला आहे. पहिल्या दिवशी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे, पण जसजसा सामना पुढं जाईल तसतसं ते सोपं होईल. या काळात फलंदाज मोठी खेळी खेळू शकतात. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करणं संघासाठी सोपं होऊ शकतं, कारण तिथं धावांचा पाठलाग करताना 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकता.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन्ही संघांची स्थिती काय : न्यूझीलंडचा संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे 11 सामन्यांत 6 विजय आणि 5 पराभवांसह 72 गुण आहेत आणि 54.550 PCT आहे. तर इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडचे 19 सामन्यांत 9 विजय, 9 पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह त्यांचे 40.790 च्या पीसीटीसह 93 गुण आहेत.
The Tegel Test Series starts tomorrow at Hagley Oval! Follow play LIVE in NZ with @TVNZ DUKE, TVNZ+, @SportNationNZ and @TheACCnz. #NZvENG pic.twitter.com/tkYPORtBfE
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 27, 2024
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ आतापर्यंत 112 वेळा कसोटीत सामने आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 112 पैकी 52 कसोटी सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं केवळ 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 47 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरुन इंग्लंडचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येतं.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतीचा इतिहास कसा : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 40 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडनं 40 पैकी 24 मालिका जिंकल्या आहेत. तर कीवी संघानं 6 कसोटी मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय 10 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
✅ Test debutant
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
✅ A change at No. 3
Our XI for the first Test against New Zealand in Christchurch is here 👇
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामना कधी खेळला जाईल?
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामना गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाचे 3.30 वाजेपासून हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचं थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 :
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साऊदी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.
इंग्लंड : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.
हेही वाचा :