ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; एक ठार तर तिघे गंभीर

author img

By

Published : Jan 17, 2020, 12:32 PM IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. दिनेश सालेकर (वय-42) यांचा जागीच मृत्यू झाला असून पूनम सालेकर व लता सालेकर या मायलेकी गंभीर जखमी आहेत.

severe accident on mumbai pune expressway near khopoli
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

रायगड: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. खोपोलीच्या हद्दीत काही अंतरावर एक इको कार थांबली होती. यावेळी पाठी मागून येणाऱ्या वॉल्व्हो बसने तिला जोरदार धडक दिली. पहाटे 5 च्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने शोल्डर लेनवर ही कार थांबली होती. यावेळी संबंधित प्रकार घडला आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे बस व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे.

दिनेश सालेकर (वय-42) यांचा जागीच मृत्यू झाला असून पूनम सालेकर व लता सालेकर या मायलेकी गंभीर जखमी आहेत. तसेच नागेश राव हा प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचले. जखमींना त्वरित पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. एक्सप्रेसवे वर वाहने थांबवू नयेत, असा नियम असताना देखील तो चालकांकडून पाळला जात नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस वर बस व इको कार मधे भीषण अपघात एक ठार तर तीन जण जखमी
रायगड - प्रविण जाधव
मुंबई पुणे एक्सप्रेस वर आज पहाटे बस व इको कार मधे भीषण अपघात झाला, या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत , खोपोली च्या हद्दित किलोमीटर 28 या अंतरावर एक इको कार थांबली असता मागून येणाऱ्या आराम बस तिला जोरदार धड़क दिली व हा अपघात घडला.Body:पहाटे 5 च्या सुमारास एक इको कार मुंबई हुन पुण्याकडे जात असताना महामार्गावरिल 28 किमी या अंतरावर शोल्डर लेन वर ही कार थांबली होती पण मागून येणाऱ्या वॉल्वो आरामबस ला ति दिसली नसावी व बस ने या कार ला जोरदार धड़क दिली यात कार मधील दिनेश सालेकर वय 42 वर्षे रा.सायन कोलीवाड़ा हे जागीच ठार झाले तर पूनम सालेकर व लता सालेकर या मायलेकी गंभीर जखमी झाल्या तसेच नागेश राव हा प्रवासी ही किरकोल जखमी झालय.Conclusion:अपघाताची माहितीं मिलताच पेट्रोलिंग,देवदूत , डेल्टा फोर्स व अपघात ग्रसतांच्या मदतीला ग्रुप चे सदस्य घटनास्थली पोहचले व जखमीना त्यांनी त्वरित पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलावले, व दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करुण रास्ता राहदारिस मोकला केला, एक्सप्रेस वर वाहने थांबवू नयेत असा नियम असताना तो चालकांकडून पालला जात नाही व असे अपघात होतात.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.