ब्रिस्टल England vs Australia 5th ODI Live Streaming : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज 29 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना ब्रिस्टलमधील काउंटी मैदानावर होणार आहे. सध्या ही मालिका 2-2 अशी बरोबरीत असल्यानं हा सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे, परिणामी हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. या सामन्यात कांगारुनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
Victory by 186 runs! 🙌
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
Come for Livingstone's fireworks 💥
Stay for the bowlers shining 👏
Full 4th ODI highlights 👇
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket
चौथ्या वनडेत काय झालं : तत्पूर्वी या मालिकेतील चौथा सामना 27 सप्टेंबर रोजी लंडनमधील लॉर्ड्स इथं खेळला गेला. या वनडे सामन्यात इंग्लंड संघानं शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा तब्बल 186 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडनं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. चौथ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं टॉसला उशीर झाला आणि सामन्यातील षटकंही कमी झाली. त्यामुळं चौथा वनडे सामना 39-39 षटकांचा खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघानं 39 षटकांत 5 गडी गमावून 312 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 24.4 षटकांत अवघ्या 126 धावांवर सर्वबाद झाला.
🏴 GET IN!!! 🦁
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
From 0-2 to 2-2...
All to play for in Bristol! 💪
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/gygp4C09NK
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड : एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आतापर्यंत 159 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियानं 90 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनं 64 सामने जिंकले आहेत. यात दोन सामने टाय झाले असून तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 76 सामने खेळले गेले आहेत. यात ऑस्ट्रेलिया संघानं 35 सामने जिंकले असून इंग्लंडनं 37 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने टाय झाले असून दोन सामन्यांचा निकाल लागला नाही.
6️⃣▪️6️⃣6️⃣6️⃣4️⃣
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
Incredible final over hitting from Liam Livingstone 💪💥
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | @liaml4893 pic.twitter.com/qfEDxOM88N
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे : 19 सप्टेंबर 2024, ट्रेंट ब्रिज, (ऑस्ट्रेलिया 7 विकेटनं विजयी)
- दुसरा वनडे : 21 सप्टेंबर 2024, हेडिंग्ले लीड्स, (ऑस्ट्रेलिया 68 धावांनी विजयी)
- तिसरा वनडे : 24 सप्टेंबर, सीट युनिक रिव्हरसाइड, चेस्टर-ली-स्ट्रीट, (इंग्लंड 46 धावांनी विजयी)
- चौथा वनडे : 27 सप्टेंबर 2024, लॉर्ड्स, (इंग्लंड 186 धावांनी विजयी)
- पाचवा वनडे : आज, काउंटी मैदान ब्रिस्टल, दुपारी 3:30 वाजता
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना रविवार 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Walking off with the winners 🙌
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
Match highlights: https://t.co/HaJmOPZ1Aj
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/w30LBahlIb
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कुठं खेळवला जाईल?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना काउंटी मैदान ब्रिस्टल इथं होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना किती वाजता सुरु होईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरु होईल.
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना भारतात टीव्हीवर कुठं पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा वनडे सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता.
Checking in with the skipper after a BIG win @HomeOfCricket! 🙌
— England Cricket (@englandcricket) September 27, 2024
🏴 #ENGvAUS 🇦🇺 @Harry_Brook_88 pic.twitter.com/50ZuoyEYiN
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या वनडे सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर पाहू शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
इंग्लंड एकदिवसीय संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा
हेही वाचा :