ETV Bharat / politics

"पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार कशी?", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - CM Eknath Shinde - CM EKNATH SHINDE

Ladki Bahin Yojana : नाशिकमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडणारे स्मृती उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (28 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं.

CM Eknath Shinde slams opponents over Ladki Bahin Yojana after Balasaheb Thackeray Memorial Park Inauguration in Nashik
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde X Account)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 7:23 AM IST

नाशिक Ladki Bahin Yojana : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय. या योजनेवरुन विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यालाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार कशी? असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय. ते नाशिकमध्ये सभेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? : यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री असलो तरी एक कॉमन मॅन आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यालादेखील मी भेटतो. केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही, तर आता संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. शिवसैनिक घरात नाही. जनतेच्या दारात शोभून दिसतात. नियम कागदावर नाही तर राबवण्यासाठी असतात. वेळ आली तर नियम बदलावेही लागतात. तसंच वेळ आल्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकारदेखील बदललं. मागचा पुढचा विचार न करता आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला. ही देना बँक आहे लेना बँक नाही."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

अजून पैसे वाढवून बहिणीला लखपती करू : पुढं ते म्हणाले, "आम्ही सत्तेत आल्यापासून अनेक विकासकामं केली. महाविकास आघाडी सरकार असताना आपण 3 नंबरला होतो. मात्र, सरकार बदलल्यावर आपण 1 नंबरवर आलोय. नंबर मिळो अथवा न मिळो आम्ही काम करत असतो. घरी बसून काही लोकांना नंबर मिळतात. ते कसं मिळतात माहिती नाही. आज आपल्याला दिल्लीपासून सगळीकडं फिरावं लागतं. बाळासाहेब असताना सगळे बाळासाहेब यांच्याकडं यायचे. तुम्ही आंदोलन करा, मी घरी बसतो असं बाळासाहेब ठाकरेंनी केलं नाही. मी बांधावर गेलो तरी माझ्यावर टीका होते. मग मुख्यमंत्र्यांचं काम घरी बसायचं आहे का? शिवसैनिक हेच माझे रक्षक आहेत. तुम्ही ताकद दिली तर तुमचा हा भाऊ दीड हजारांवर थांबणार नाही. अजून अडीच हजार, तीन हजार, साडे तीन हजा वाढवून बहिणीला लखपती करू," असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "या उद्यानातील कलादालनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रं आणि छायाचित्रं पाहायला मिळणार आहेत. यासोबतच या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहेत. तसंच येथे उत्तम कलादालन, साहसी खेळांचा समावेश असेल आणि अशाप्रकारे हे एकमेवाद्वितीय असे ऍडव्हेंचर पार्क ठरेल", असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित शोसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

हेही वाचा -

  1. "सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट खुली केली, तर सरकारनं 'लाडकी बहीण योजने'तून..." - CM Eknath Shinde On Phule
  2. गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - EKNATH SHINDE NEWS
  3. कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - CM DCM Slams Vijay Wadettiwar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.