ETV Bharat / state

सेना, राष्ट्रवादीला मतदान केल्याचे फोटो व्हायरल करणाऱ्या परभणीतील चौघांवर गुन्हा दाखल

परभणी लोकसभा मतदार संघात गुरुवारी मतदान पार पडले. या दरम्यान, परभणी शहरात शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान केल्याचा फोटो गुपचुप मोबाईलमध्ये काढून तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. यामुळे याची दखल निवडणूक विभागाने घेऊन त्यांच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

author img

By

Published : Apr 19, 2019, 8:39 AM IST

Updated : Apr 19, 2019, 9:08 AM IST

सेना, राष्ट्रवादीला मतदान केल्याचे फोटो व्हायरल करणाऱ्या परभणीतील चौघांवर गुन्हा दाखल

परभणी - आपल्या नेत्याला मतदान करताना त्याचा गुपचूप फोटो काढून तो व्हायरल करण्याचा प्रताप परभणीतील चार तरुणांना महागात पडला आहे. या चारही तरुणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी लोकसभा मतदार संघात गुरुवारी मतदान पार पडले. या दरम्यान, परभणी शहरात शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान केल्याचा फोटो गुपचुप मोबाईलमध्ये काढून तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. शिवाय 'मी अमुक उमेदवाराला मतदान केले असून तुम्ही देखील करा, असे आवाहन त्यांनी केले.

यामुळे याची दखल निवडणूक विभागाने घेऊन त्यांच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. प्रकाश लाखरा, विलास पाटील व मनोज धस पाटील अशी शिवसेना कार्यकर्त्यांची नावे असून अजित जयस्वाल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यावर निवडणूक विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून आचारसंहितेचा भंग झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नव्हते. आज मतदान पेट्या गोळा करून कस्टडित ठेवण्याच्या कामात पोलीस व्यस्त असून त्यांच्यावर उद्या कारवाई होण्याची शक्यता आहे.

Intro:परभणी - आपल्या नेत्याला मतदान करतांना त्याचा गुपचूप फोटो काढून तो व्हायरल करण्याचा प्रताप परभणीतील चार तरुणांना महागात पडला आहे. या चारही तरुणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Body:परभणी लोकसभा मतदार संघात गुरुवारी मतदान पार पडले. या दरम्यान, परभणी शहरात शिवसेनेच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान केल्याचा फोटो गुपचुप मोबाईलमध्ये काढून तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे. शिवाय 'मी अमुक उमेदवाराला मतदान केले असून तुम्ही देखील करा, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे याची दखल निवडणूक विभागाने घेऊन त्यांच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. प्रकाश लाखरा, विलास पाटील व मनोज धस पाटील असे शिवसेना कार्यकर्त्यांची नावे असून अजित जयस्वाल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यावर निवडणूक विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून आचारसंहिता भंग पावली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी मात्र कोणालाही ताब्यात घेतले नव्हते. आज मतदान पेट्या गोळा करून कस्टडित ठेवण्याच्या कामात पोलीस व्यस्त असून त्यांच्यावर उद्या कारवाई होण्याची शक्यता आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- मतदान मशिनचा photo, व पोलीस अधीक्षक बिल्डिंग vis
Conclusion:
Last Updated : Apr 19, 2019, 9:08 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.