मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिचा चॅट शो 'व्हॉट वीमेन वॉन्ट' सीझन 5 होस्ट करत आहे. या सीझनची पहिली पाहूणी म्हणून आलिया भट्ट आली. त्यामध्ये दोघींनी अनेक रंजक गप्पा केल्या. दरम्यान, आलियानं राहाबाबत अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. अलीकडेच आलिया तिच्या नावात रणबीरचं आडनाव जोडल्यामुळे ती चर्चेत आली होती. नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये तिनं यासंदर्भात एक विधान केलं होतं. दरम्यान करीना तिच्या शोमध्ये, जेव्हा नाव बदलण्याबद्दल विचारले, तेव्हा आलिया लगेच सांगितलं की, 'हे विनोदासारखे होते, अर्थातच मी शोमध्ये सुनील ग्रोव्हरला विनोदानं उत्तर दिलं होतं.' यानंतर आलिया म्हणते की, 'रणबीर भट्ट आहे आणि मी कपूर आहे.'
राहा कपूरनं दिलं वडील रणबीरला नवीन नाव : यानंतर आलियानं याचं प्रश्नाला चतुराईनं फिरवलं आणि सांगितलं, 'राहा कधी-कधी रणबीरला 'पापा भट्ट' म्हणते. याशिवाय ती आजही मला आलिया कपूर म्हणते. ती माझे नाव नेहमी बदलत असते. या संवादामुळे आलियाच्या आडनाव बदलण्याच्या निर्णयावर शंका निर्माण झाली आहे. दरम्यान आलियाकडे राहाविषयी अनेक मनोरंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल तिनं शोमध्ये सांगितलं. आलियानं या शोमध्ये पुढं म्हटलं, तिला एडीएचडी या आजाराची माहिती झाली, हे सर्व एका साइकोलॉजिकल टेस्टनंतर समोर आलं. यानंतर तिनं पुढं सांगितलं, लहानपणी ती तिच्या वर्गातील मुलांपासून दूर राहायची आणि कधी कधी संवादादरम्यान रागावायची. अलीकडेच आलियाला तिच्या आजाराची माहिती मिळाली. आलियानं या आजाराविषयी तिच्या मित्रमंडळीना शेअर केलं, तेव्हा हे सर्व त्यांना आधीच माहिती झालं, असं त्यांनी मला सांगितलं.
आलिया भट्टचं वर्कफ्रंट : आलिया सध्या वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये यशस्वीपणे चालू आहे. आलिया आणि करण जोहरनं या चित्रपटाची एकत्रपणे निर्मिती केली आहे. 'जिगरा' व्यतिरिक्त आलिया यशराजच्या स्पाय यूनिवर्सच्या पुढील चित्रपट 'अल्फा'मध्ये दिसणार आहे. ती संजय लीला भन्साळी यांच्या मोस्ट अवेटेड 'लव्ह अँड वॉर'मध्ये देखील असणार आहे, यामध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करतील.
हेही वाचा :