पंढरपूर - यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान विणेकऱ्यांनाच मिळणार आहे. चिठ्ठ्या टाकून ही निवड होणार आहे.
मी मॅनेज झालो असे बोलतात, मी छत्रपतींच्या घरात जन्म घेतलाय हे लक्षात ठेवावं - संभाजीराजे छत्रपती - breaking news live
19:18 July 03
यंदाही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान विणेकऱ्यांना
19:14 July 03
नागपुरात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
नागपूर - स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. प्रमोद यांना अगोदर कोविड झाला होता. त्यानंतर ब्लॅक फंगस आजाराने त्यांना ग्रासले होते. त्यात एक डोळा पूर्णपण निकामी झाला, तर दुसरा डोळा 80% खराब झाला होता. त्यामुळे ते त्रस्त होते, म्हणून आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
19:05 July 03
मी मॅनेज झालो असे बोलतात, मी छत्रपतींच्या घरात जन्म घेतलाय हे लक्षात ठेवावं - संभाजीराजे छत्रपती
औरंगाबाद - सत्तेत नसणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन उत्तर शोधलं पाहिजे, सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणासंदर्भात योग्य बाजू मांडली नाही. आम्हाला आरक्षण कस देता ते सांगा, न्यायालयाने तुम्ही सामाजिक मागास नाही असं सांगितलं. अनेक मुद्द्यांवरून आपलं आरक्षण रद्द केलं, ज्यात आपण उच्चवर्णीय असल्याचं सांगितलं, आपण आपल्या समाजाला विश्वासात घेण्याची गरज आहे, संभाजीराजे किधीही आवाज चढवून बोलले नाही, मात्र आज इतर समन्वयक कसे बोलतात तसं बोलण्याचा प्रयत्न करत आहे, मी मॅनेज झालो असे बोलतात, मी छत्रपतींच्या घरात जन्म घेतलाय हे लक्षात ठेवावं, असे परखड वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगाबादेत केलं आहे.
16:57 July 03
करमाळ्यात शेतीच्या वादातून पती-पत्नीवर हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल
पंढरपूर - करमाळा तालुक्यातील राजुरीत शेतीच्या वादातून पती-पत्नीवर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. करमाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16:02 July 03
पोलीस भरतीच्या वेटींग लिस्टमधील उमेदवारांचे मुंबईत आंदोलन
मुंबई - आज पोलीस भरतीतील उमेदवारांनी आंदोलन केलं. जवळपास 200 उमेदवारांनी हे आंदोलन केलं. 2018 साली भरती झालेल्या 100 टक्के उमेदवारांपैकी 75 टक्के उमेदवारांना सेवेत घेतले आहे. दरम्यान, उर्वरित 25 टक्के उमेदवार अद्याप सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून या 25 टक्के उमेदवारांची कोणतीही प्रतीक्षा यादी देखील तयार केली नाही.
15:23 July 03
नर्मदा बचाव आंदोलन : सदगुरु भय्याजी सरकार यांची प्रकृती बिघडली, नागपुरात उपचार सुरू
नागपूर - मध्यप्रदेशमधील सदगुरु भय्याजी सरकार यांचे नर्मदा बचावासाठी मागील 256 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आंदोलन सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या नागपुरात उपचार सुरू आहेत.
12:38 July 03
अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
12:34 July 03
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. अद्यापही ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे. मात्र, आम्ही डॉक्टर्सच्या परवागीची वाट पाहत आहोत. आज त्यांना डिस्चार्ज दिला जाणार नाही, अशी माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिली. दरम्यान, दिलीप कुमार यांना मुंबईतील पी. डी. हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसानाच्या समस्येमुळे त्यांच्यावर 30 जूनपासून उपचार केले जात आहेत.
12:30 July 03
टीव्ही अभिनेता प्राचीन चौहान यांना एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. चौहान यांनी कसौटी जिंदगी की (सिजन 1) मध्ये काम केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12:29 July 03
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महागाई वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १४० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलने १०५ रुपये प्रति लीटरचा आकडा ओलांडला आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. आधीच कोरोनासारख्या साथरोगामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक या कोरोनामुळे पूर्णपणे पिचले गेले आहेत. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने धोरण आखून महागाई नियंत्रणात आणण्याची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
09:19 July 03
अनिल देशमुख दिल्लीला रवाना
माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते तिथे कायदेविषयक सल्ला घेणार आहेत आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. याच संदर्भात ईडीने समन्स बजावून ही चौकशीला देशमुख हजर राहिले नाहीत. देशमुखांनी ईडीकडे गुन्ह्यांचा कागदपत्रेही मागितली होती. ती देण्यास ईडीने नकार दिल्याने देशमुख आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. ईडी देशमुखांना लवकरच तिसरे समन्स पाठवू शकते. किंवा समन्सच्या आधारावर थेट देशमुखांची घरी चौकशी करू शकते.
09:19 July 03
सीबीआयला सचिन वाझेची चौकशी करण्याची परवानगी
सीबीआयला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. काल (शुक्रवारी) एनआयएच्या विशेष न्यायालयाने सीबीआयला सचिन वाझेची तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणाच्या आरोपांसदर्भात सीबीआयकडून वाझेची चौकशी करण्यात येणार आहे. सीबीआयने यासंदर्भात एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज करून परवानगी मागितली होती.
08:59 July 03
अभिनेता डीनो मोरिया आणि संजय खान तथा डीजे अकील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. त्यांच्या गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेकशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून त्यांनी 8 कोटी 79 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
08:34 July 03
नागपूरनंतर अमरावतीत घडलं मोठं हत्याकांड; एकाच कुटूंबातील तिघांचे मृतदेह आढळले कुजलेल्या अवस्थेत
अमरावती - आठ दिवसांपूर्वी कौटुंबिक कलहातून एका व्यक्तीने कुटूंबातील पाच जणांची निर्दयी हत्या करून स्वतःहा आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद समोर आली आहे. आपल्या १६ वर्षीय मुलीची व ४० वर्षीय पत्नीची हत्या करुन पतीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी थरारक हत्याकांड घडले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिनही मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
08:34 July 03
ह. भ. प. बंडातात्या कराडकर हे पायी वारी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सध्या त्यांना आळंदी-पुणे रोडवरील संकल्प गार्डन मंगल कार्यालय येथे त्यांच्या समर्थकांसह पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे इतर समर्थक स्थानबद्ध केलेल्या ठिकाणाच्या समोर टाळ मृदुंगाच्या गजरात ठिय्या मांडून बसले आहेत.
08:32 July 03
आळंदी/पुणे - बंडातात्या कराडकर आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात
कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे कराडकरांनी जाहीर केले. त्यानुसार पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले. मात्र, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
06:41 July 03
नवी मुंबई (ठाणे) - कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत 290 किलो हिरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत 300 कोटी रुपये इतकी आहे. ही कारवाई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून करण्यात आली. यानंतर कस्टम विभागाने हे प्रकरण महसूल गुप्तचर संचलनालयाकडे दिले. याप्रकरणी दोन जणांची चोकशी सुरू आहे.