ETV Bharat / state

'बार्टी' प्रमाणेच 'आर्टी'साठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू - अर्जुन खोतकर

author img

By

Published : Dec 6, 2020, 5:31 PM IST

'बार्टी' प्रमाणेच 'आर्टी'ची स्थापना करावी, अशी मागणी मातंग समाजातर्फे करण्यात आली होती. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले.

we-will-follow-up-with-the-chief-minister-for-arti-said-arjun-khotkar-in-jalna
'बार्टी' प्रमाणेच 'आर्टी' साठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू - अर्जुन खोतकर

जालना - बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्थेकडून मातंग समाजासोबत अन्याय होत असल्यामुळे या संशोधन संस्थेप्रमाणे आर्टी (अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था) स्थापना करावी, अशी मागणी मातंग समाजातर्फे करण्यात आली होती. या मागणीसंदर्भात बोलताना आर्टीच्या स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंतीनिमित्त काल जालन्यात सर्वपक्षीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना ते बोलत होते.

अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया

'बार्टी' प्रमाणेच 'आर्टी'साठी प्रयत्न करू -

'बार्टी' या प्रशिक्षण संस्थेकडून मातंग समाजबांधवांवर अन्याय होत असून अनेक तरुण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय इंचे यांनी केला होता. त्यामुळे 'बार्टी' प्रमाणेच 'आर्टी' स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे केली होती. संजय इंचे यांच्या मागणीसंदर्भात बोलतान आपण आर्टीच्या स्थापनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिले. दरम्यान, या जयंती उत्सव कार्यक्रमापूर्वी पंचशीला भालेराव यांचा अण्णाभाऊ साठे यांनी रचलेल्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा - मुंबईच्या लालबाग गणेशगल्ली परिसरातील साराभाई इमारतीला आग; १६ रहिवासी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.