ETV Bharat / state

भोकरदनमधून 59 परप्रांतीय कामगार स्वगृही रवाना

author img

By

Published : May 11, 2020, 2:17 PM IST

Updated : May 11, 2020, 5:26 PM IST

भोकरदन तालुक्यातील काँग्रेस नेते राजाभाऊ देशमुख यांच्याकडून परप्रांतीय कामगारांसाठी जालना रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा पुरवण्यात आली होती.

migrant workers Bhokardan
भोकरदनमधून परप्रांतीय कामगार स्वगृही रवाना

जालना - भोकरदन तालुक्यात उत्तर प्रदेश येथून रोजंदारीसाठी अनेक नागरिक आले होते. त्यापैकी 59 स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात आले आहे. या कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी जालना ते उन्नत (उत्तर प्रदेश) पर्यंत एका विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.

भोकरदन तालुक्यातील काँग्रेस नेते राजाभाऊ देशमुख यांच्यावतीने परप्रांतीय मजूरांना रेल्वे स्थानकापर्यंत मोफत बससेवा..

हेही वाचा... जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर मात, घरी परतल्यानंतर कार्यकर्त्यांना खिडकीतून दिले दर्शन

सर्व परप्रांतीय कामगारांना भोकरदन येथून जालना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचवण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मोफत बससेवा उपलब्ध करु दिली होती. श्री गणपती इंग्लिश स्कूलच्या बस यासाठी वापरण्यात आल्या. यावेळी भाजपा जालना जिल्हा अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे, तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार काशिनाथ तांगडे, सचिन वाघमारे यांच्यासह तहसील कार्यालय कर्मचारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

भोकरदन शहरातील तरुणांकडून यावेळी परप्रांतीय कामगारांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जेवण झाल्यानंतर त्यांना भाजी, पोळी पार्सल देण्यात आली आहे.

Last Updated : May 11, 2020, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.