ETV Bharat / state

‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." - Supriya Sule - SUPRIYA SULE

Supriya Sule On Dharmaveer 2 : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी 'धर्मवीर 2' चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र, यावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं बघायला मिळतंय.

Supriya Sule reaction on Ekanth Shinde dharmaveer 2 marathi movie
सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 1:41 PM IST

पुणे Supriya Sule On Dharmaveer 2 : 'धर्मवीर' चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं या चित्रपटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्या पुण्यामध्ये बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी कोणताही चित्रपट करमणूक म्हणून बघते. राजकारण खूप गांभीर्यानं करते. मी दोन्ही एकत्र करत नाही. आम्ही राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आलोय. सिनेमा ही एक इंडस्ट्री असून त्याकडं करमणूक म्हणून पाहिलं पाहिजे. जी घटना 23 वर्षांपूर्वी झाली, इतकं वर्ष तुमचं सरकार होतं. गृहखात तुमच्याकडं होतं. तुमचा हेतू स्पष्ट असेल तर टेलिव्हिजनमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही पोलीस आयुक्तांकडं गेलं पाहिजे", असं सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया : "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्राचं अर्थकारण अडचणीत आहे असं जर ते म्हणत असतील तर ही चिंतेची बाब आहे. याला जबाबदार ट्रिपल इंजिनचं सरकार आहे", असा आरोप त्यांनी केला.

आमच्या पक्षात लोकशाही चालते : पुढं सुळे म्हणाल्या, "इंदापूरमधील अनेक नेते मंडळी रविवारी शरद पवारांना आणि मला येऊन भेटले. त्यांची इतकीच विनंती आहे की, राष्ट्रवादी आणि आमचं जे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सर्वांनी लढावं. आमचा पक्ष हा नेत्यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पुढं चालणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात लोकशाही चालते. हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. कोण काय राजकीय निर्णय घेईल, याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही."

हेही वाचा -

  1. "धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत आजही संशयाला वाव"; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया - Uday Samant
  2. ‘धर्मवीर 2’वरुन रोहित पवारांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले, "निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट..." - Dharmaveer 2
  3. 'धर्मवीर 2' चित्रपटावर टीका करणार्‍यांना प्रविण तरडेंनी दिलं प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले? - Pravin Tarde On Sushma Andhare

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.