ETV Bharat / entertainment

मिथुन चक्रवर्तींचा चित्रपटसृष्टीत दबदबा कायम, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास - Mithun Dadasaheb Phalke Honour

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Mithun Dadasaheb Phalke Honour : मिथुन चक्रवर्ती यांना 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. मिथुन चक्रवर्ती हे एक प्रसिद्ध अभिनेते असून त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

Mithun Chakraborty
मिथुन चक्रवर्तीं (संग्रहित छायाचित्र)

मुंबई Mithun Dadasaheb Phalke Honour :- दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती चित्रपट सृष्टीत आजही आपला आब राखून आहेत. मिथुन चक्रवर्तींनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केलेत. विशेष म्हणजे या अभिनेत्याला 8 ऑक्टोबर 2024 रोजी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. मिथुन चक्रवर्ती हे एक प्रसिद्ध अभिनेते असून, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. हिंदी व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली, ओरिया, भोजपुरी, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी भाषेत 350 हून अधिक चित्रपट केलेय.

कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट: भोजपुरी चित्रपट हा मिथुन चक्रवर्ती यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट मानला जातोय. भोले शंकर नावाच्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती दिसले होते. वयाच्या 74 व्या वर्षीही मिथुन चक्रवर्ती चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.

फक्त 4 महिने संबंध टिकले: मिथुन चक्रवर्ती यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक प्रसंग घडलेत. मिथुन चक्रवर्ती यांनी 1979 मध्ये अभिनेत्री हेलेना ल्यूकशी लग्न केले. पण हे नाते फक्त 4 महिने टिकले. घटस्फोटानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीशी लग्न केले आणि त्यांना 4 मुले आहेत.

योगितासाठी लग्न सोपे नव्हते : मिथुन चक्रवर्ती आणि योगिताचे आई-वडील त्यांच्या लग्नावर खुश नव्हते. योगिता घरातील चांगली सून बनू शकेल, याची त्यांना खात्री नव्हती. परंतु योगिताने कुटुंबासाठी खूप मेहनत घेतली अन् कालांतराने कुटुंबीयांनाही योगिता आवडायला लागली. योगिताचे हे दुसरे लग्न होते, पण हे लग्न तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. योगिताचे किशोर कुमार यांच्याशी 1976 साली लग्न झाले होते, पण लग्नाच्या ३ वर्षांनंतर ते वेगळे झाले. किशोर कुमार यांच्याशी लग्न झालेले असतानाच योगिताचे मिथुन चक्रवर्तींसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. ही बाब किशोर कुमार यांना कळताच ते संतापले. तेव्हापासून त्यांनी मिथुन चक्रवर्तीच्या कोणत्याही चित्रपटात गाण्यास स्पष्टपणे नकार दिला.

मिथुन चक्रवर्ती 327 कोटींच्या संपत्तीचे मालक: मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेत्री योगिता बालीसोबत लग्न केलेय. कुटुंबासोबतच ते राजकारणातही वेळ देत आहेत. अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी काम केले असून, राजकीय पक्षांमध्येही त्यांनी योगदान दिलंय. तसेच मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे मुंबई, उटी, कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये अनेक मालमत्ता आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे सुमारे 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 327 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

मिथुन चक्रवर्तींकडे 114 कुत्रे आहेत : मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे 114 कुत्रे आहेत. त्यांच्या मुंबई आणि उटी येथील बंगल्यात जवळपास 114 कुत्रे आहेत. मुंबईतील मड आयलंड येथील त्यांच्या बंगल्यावर 76 कुत्रे आहेत, तर उटी येथील त्यांच्या बंगल्यावर 38 कुत्रे आहेत. मुंबईतील त्यांच्या बंगल्यात त्यांनी कुत्र्यांसाठी खास घरही बनवलेय, ज्यामध्ये अनेक आलिशान सुविधा आहेत.

अनेक लक्झरी हॉटेल्सचे मालक : अभिनयासोबतच मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक रिॲलिटी शोचे जज म्हणूनही काम केलेय. हॉटेल इंडस्ट्रीतही त्यांचे नाव आहे. मिथुन चक्रवर्ती व्यवसायासोबतच चित्रपटांमध्येही खूप यशस्वी आहेत. मिथुन चक्रवर्ती अभिनेते असण्यासोबतच 'मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्स'चे मालक आहेत. त्यांची उटी, तामिळनाडूतील मसिनागुडी आणि कर्नाटकातील म्हैसूर येथे अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. मिथुन यांची या हॉटेल्समधून भरपूर कमाई होते.

मिथुन चक्रवर्तींचे 46 कोटींचे घर : अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे मुंबईतील मड आयलँड परिसरात त्यांचे कुटुंब आणि कुत्र्यांसह आलिशान बंगल्यात राहतात. मड आयलंडमधील या घराची किंमत सुमारे 46 कोटी रुपये आहे. याशिवाय मिथुन चक्रवर्ती यांचे मुंबईतील वांद्र्यात एक आलिशान घर आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती यांचे उटी येथे एक फार्महाऊस आहे, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. मिथुन चक्रवर्ती या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी जातात.

मिथुन चक्रवर्तीकडे आलिशान गाड्या : खरं तर कोट्यवधींची संपत्ती असूनही मिथुन चक्रवर्ती यांना अतिशय साधे जीवन जगणे आवडते. मात्र, मिथुन चक्रवर्ती यांना आलिशान कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, फोर्ड एंडेव्हर, टोयोटा फॉर्च्युनर अशा अनेक गाड्या आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केलीय.

हेही वाचाः

'डिस्को डान्सर'च्या अभिनयसामर्थ्याला सर्वोच्च पुरस्काराची दाद, मिथुन चक्रवर्ती यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर - Dadasaheb Phalke Award

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.