ETV Bharat / entertainment

शाहरुख खानला आयफा 2024मध्ये आर्यन खानच्या अटकेचे दिवस आठवले, म्हणाला- 'टफ टाइम' - IIFA 2024 - IIFA 2024

IIFA 2024: आयफा 2024मध्ये शाहरुख खाननं मुलगा आर्यन खानच्या अटकेचा संदर्भ देत 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा त्याचा कठीण काळ आठवला. त्याला आयफामध्ये 'जवान' चित्रपटामधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

IIFA 2024
आयफा 2024 (आईफा 2024 शाहरुख खान (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 1:37 PM IST

मुंबई - IIFA 2024 : अभिनेता शाहरुख खान आणि विकी कौशलनं इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) अवॉर्ड्स 2024मध्ये होस्टिंग केलं. 'किंग खान'ला 'जवान' चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या मोठ्या सन्मानाबद्दल त्यानं सर्वांचे आभार मानलं. आपल्या भाषणादरम्यान, त्यानं आर्यन खानच्या अटकेशी संबंधित असलेल्या 'जवान'च्या शूटिंगदरम्यानच्या कठीण काळबद्दल उल्लेख केला. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती.

शाहरुख खाननं केली कठिण काळाची आठवण : शाहरुख खानला इंडियन फिल्म अकादमी सोहळ्यात अवॉर्ड मिळल्यानंतर त्यानं म्हटलं, "मला इतर सर्व नामांकित रणवीर सिंग, रणबीर कपूर, विक्रांत मॅसी यांचे आभार मानायचे आहेत. हे सर्व चित्रपटात उत्तम होते. विकी कौशल आणि सनी पाजी, मला वाटते की हे उत्कृष्ट आहे. परंतु मला हा सन्मान मिळाला. कारण मी इतक्या दिवसांनी काम केलं, याचा लोकांना आनंद झाला.'किंग खान'नं पुढं म्हटलं, "मला कोणीतरी आठवण करून दिली की, चित्रपटात पैसे गुंतवणं महत्त्वाचे आहे. म्हणूनच मला गौरीचे आभार मानायचे आहेत. ती पतीवर अधिक खर्च करणारी पत्नी आहे." आर्यन खान प्रकरणाचा संदर्भ देत त्यानं सांगितलं, "जवान बनवताना आम्ही कठीण काळातून जात होतो."

आर्यन खान ड्रग्स केस : 3 ऑक्टोबर 2021 रोजी, शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर आर्यन हा 20 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिला. याप्रकरणी अधिक चौकशी झाल्यानंतर आर्यनला एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) क्लीन चिट मिळाली. यावेळी आर्यननं सांगितलं होतं की, तो कोणत्याही मोठ्या ड्रग डीलिंग टोळीचा सदस्य नाही. आर्यन खानचं हे प्रकरण खूप गाजल होतं. यावेळी शाहरुखनं आपल्या मुलाला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. हा काळ आर्यन खानसाठी खूप कठीण होता.

हेही वाचा :

  1. आयफा अवॉर्ड्स 2024 : शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - IIFA 2024 Winners Full List
  2. आयफा अवॉर्ड 2024 साठी शाहरुख खान अबु धाबीत दाखल, 'द किंग'च्या डॅशिंग लूकवर फॅन्स फिदा - SRK arrives in Abu Dhabi for IIFA
  3. 20 वर्षांनंतरही शाहरुख खानच बॉक्स ऑफिसचा 'वीर', शाहरुखच्या 20 वर्ष जुन्या चित्रपटानं केली 100 कोटींची कमाई - Veer Zaara creates history

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.