कानपूर Ravindra Jadeja 300 Wickets : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील कानपूर कसोटी सामन्याचा आज (30 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, आर. अश्विन आणि आकाश दीपनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जडेजानं शेवटची विकेट घेतली. यासह रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरलाय. बांगलादेशकडून कर्णधार मोमिनुल हकनं सर्वाधिक नाबाद 107 धावांचं योगदान दिलं.
300 TEST WICKETS FOR RAVINDRA JADEJA.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
- One of the greatest all rounders of Test cricket! 👏 pic.twitter.com/3LiPfadnQs
रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक : रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले आहेत. रवींद्र जडेजानं 74 कसोटी सामन्यांत 300 विकेट्स घेतल्या आहेत. कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी खालिद अहमदला बाद करुन रवींद्र जडेजानं कसोटी क्रिकेटमधील ही मोठी कामगिरी केली आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज खालिद अहमद हा कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाचा 300 वा बळी ठरला आहे.
THE HISTORIC MOMENT FOR JADDU. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
- Jadeja, the quickest Asian with 300 wickets and 3,000+ runs in Tests. 🇮🇳 pic.twitter.com/y0pz8DZfuz
भारतीय संघाचा सर्वात मोठा मॅचविनर : रवींद्र जडेजा हा भारतीय संघाचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. रवींद्र जडेजानं 74 कसोटी सामन्यांत 300 विकेट्स घेतल्या असून 3122 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजानं 13 वेळा कसोटी सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रवींद्र जडेजानं दोन वेळा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
300 Test wickets.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2024
3,122 Test runs.
RAVINDRA JADEJA, THE GOAT IN TEST FORMAT. 🐐 pic.twitter.com/3M7CjKwjGD
लेगस्पिनर अनिल कुंबळे अव्वल स्थानावर : भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. अनिल कुंबळेनं कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटशिवाय रवींद्र जडेजानं 197 एकदिवसीय सामन्यांमध्ये 220 विकेट्स आणि 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 बळी घेतले आहेत. रवींद्र जडेजानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 2756 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 515 धावा केल्या आहेत. 240 आयपीएल सामन्यांमध्ये रवींद्र जडेजानं 160 विकेट घेतल्या आहेत आणि 2959 धावा केल्या आहेत.
That's the milestone wicket for @imjadeja 👏👏
— BCCI (@BCCI) September 30, 2024
He picks up his 300th Test wicket. Becomes the 7th Indian to achieve this feat.#TeamIndia #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8JlBn3hKfJ
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज :
- अनिल कुंबळे - 619 विकेट्स
- रविचंद्रन अश्विन - 523* विकेट्स
- कपिल देव - 434 विकेट्स
- हरभजन सिंग - 417 विकेट्स
- इशांत शर्मा/झहीर खान - 311 विकेट्स
- रवींद्र जडेजा - 300* विकेट्स
हेही वाचा :