ETV Bharat / state

रेल्वे विद्युतीकरण परळीकडून सुरू करण्याची मागणी

author img

By

Published : Mar 17, 2021, 7:55 PM IST

विकाराबाद -परळी वैजनाथ मार्गाचे विद्युतीकरण काम प्रगतीपथावर असून जहीराबादपर्यंत खांब टाकणे पूर्ण झाले तर बिदरपर्यंत अर्थवर्किंग झाले आहे. परळीकडूनही विद्युतीकरणाचे काम सुरू झाले तर विद्युतीकरण लवकर पूर्ण होईल, अशी मागणी रेल्वे कृती समितीचे सदस्य संजय आघाव यांनी केली आहे.

start railway electrification from Parli
परळी वैजनाथ रेल्वे समस्या

परळी वैजनाथ - दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत विकाराबाद -परळी वैजनाथ मार्गाचे विद्युतीकरण काम प्रगतीपथावर असून जहीराबादपर्यंत खांब टाकणे पूर्ण झाले तर बिदरपर्यंत अर्थवर्किंग झाले आहे. वर्षाअखेर परळीपर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या विद्युतीकरणाचे काम परळीकडूनही सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

देशात रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने विकाराबाद - परळी विद्युतीकरण सुरू करण्यात आले आहे. विकाराबाद परळी २६७ किलोमीटर अंतर असून यातील ९५ किलोमीटरचे काम पूर्ण होत आले आहे. १७२ किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. यामुळे विकाराबाद प्रमाणेच खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पाठपुरावा केला तर परळीकडूनही विद्युतीकरण कामाला सुरुवात झाली तर हे काम लवकर पूर्ण होईल व प्रवाशांना याचा लाभ होईल.

दरम्यान रेल्वे कृती समितीचे सदस्य संजय आघाव यांनी मागणी केली आहे की, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे या कामासंदर्भात पाठपुरावा करून हे विद्युतीकरणाचे काम परळी मार्गाकडूनही सुरू करण्यात यावे. परळीकडूनही विद्युतीकरणाचे काम सुरू झाले तर विद्युतीकरण लवकर पूर्ण होईल.

हेही वाचा - अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.