ETV Bharat / state

औरंगाबादेत वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचा वाद, इम्तियाज जलील यांना डावलले

author img

By

Published : Jun 8, 2019, 11:49 AM IST

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या असून या पत्रिकेत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव छापण्यात आले. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या गेटसमोर निदर्शने केली.

एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते निदर्शने करताना

औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याचा एमआयएमच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नामकरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न टाकल्यामुळे तसचे त्यांना याचे निमंत्रण न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते निदर्शने करताना

नामकरण सोहळ्यासाठी महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या असून या पत्रिकेत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव छापण्यात आले आहे. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे एमआयएम पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या गेटसमोर निदर्शने केली.

जलील यांना निमंत्रण न देऊन शिवसेनेने त्यांचा अवमान केला असल्याचा आरोप एमआयएमतर्फे करण्यात आला. महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित करून जाब विचारणार असल्याचे एमआयएमच्या महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सरिता बोर्डे यांनी सांगितले. आंदोलनामुळे नामकरण सोहळ्यास जवळपास अर्धातास उशिर झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर नामकरण सोहळ्याला सुरूवात झाली. नामकरणाच्या कार्यक्रमामुळे सुरू झालेल्या या वादाने शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव किती जिव्हारी लागला हेदेखील समोर आले. मात्र, या पत्रिकेत कोणत्याच आमदार आणि खासदारांचे नाव टाकलेले नाही त्यामुळे याविषयाचे राजकारण करू नये, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

Intro:सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएमच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नामकरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.Body:नामकरण सोहळ्याच्या महानगर पालिकेने निमंत्रण पत्रिका छापल्या असून या पत्रिकेत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव छापण्यात आलं मात्र खासदार इम्तियाज जलील यांचं नाव मात्र टाकण्यात आल नसल्याने एमआयएम पक्षाच्या नाहरसेवाक आणि कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या गेट समोर निदर्शन केली.Conclusion:खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण न दिल्याने हा त्यांचा अवमान शिवसेनेने केला असल्याचा आरोप एमआयएम तर्फे करण्यात आला. महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित करून जाब विचारणार असल्याचं एमआयएमच्या महानगर पपिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सरीता बोर्डे यांनी सांगितलं. आंदोलनामुळे नामकरण सोहळ्यास जवळपास अर्धातास उशीर झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर नामकरण सोहळ्याला सुरुवात झाली. नामकरणाच्या कार्यक्रमामुळे सुरू झालेल्या या वादाने शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव किती जिव्हारी लागला हे देखील समोर आलं. मात्र या पत्रिकेत कोणत्याच आमदार आणि खासदारांचे नाव टाकलेले नाही त्यामुळे याविषयाच राजकारण करू नये असं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं.
Byte - सरीता बोर्डे - विरोधीपक्ष नेत्या
Byte - नंदकुमार घोडेले - महापौर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.